मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे......
राज्यसरकारे या निकालाचा आधार घेऊन जाती - जाती मध्ये भांडणे लावून बंधुभाव समाप्त करेल यामुळे बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन कुमारी मायावतीजी यांच्या निर्देशानुसार बहुजन समाज पार्टीच्या वतीने दिनांक २१ऑगस्ट २०२४ रोजी भारत बंदची हाक दिली असल्याचे पक्षाचे प्रदेश महासचिव डॉ. हुलगेश चलवादी यांनी सांगितले .
१ ऑगस्ट २०२४ रोजी सुप्रीम कोर्टाने संविधान विरोधी निकाल दिल्यामुळे अनुसूचित जाती व जमातीतील तसेच वंचित समाजातील लोकांसाठी जस्टीस गवई यांनी क्रिमिनल कायदा लागू करू असे वक्तव्य करून समाजामध्ये तिढा निर्माण केला असून तोडा , फोडा राज्य करा या दृष्टिकोनातून घेतलेल्या या निर्णयाविरोधात बसपाच्या नेत्या बहन कुमारी मायावती यांनी पुढाकार घेऊन आवाज उठवला आहे, एससी. एसटी व बहुजनांचे संविधानिक अधिकार शाबूत ठेवण्यासाठी सर्व बहुजनांनी भारत बंद पाळून सर्वांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जिल्हाधिकारी पुणे या ठिकाणी २१ऑगस्ट २०२४ रोजी भारत बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन डॉक्टर हुलगेश चलवादी यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments