Type Here to Get Search Results !

सौ. सुनेत्रावहिनी पवार यांनी पुणे शहराच्या भेटीगाठी दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर कार्यालयाला भेट दिली.

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज

पुणे...

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. सुनेत्रावहिनी पवार यांनी पुणे शहराच्या भेटीगाठी दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर कार्यालयाला भेट दिली. 




यावेळी सौ. सुनेत्रा वहिनींनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचे नियोजन आणि निवडणूक तयारीबद्दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 




पक्षाच्या संघटनात्मक कार्यवाहीचा आढावा घेत असतानाच लोकसभेच्या प्रचाराच्या धामधूमीतही काही क्षण निवांतपणे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी हितगुज साधले. सर्वांशी संवाद साधत बारामती लोकसभेच्या प्रचाराचा आढावा घेतला. तसेच संघटनावाढीसाठी घेत असलेल्या मेहनतीबद्दल कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांचा उत्साह द्विगुणित केला.


#राष्ट्रवादीकाँग्रेसपार्टी #NCP #ncpspeaks #बारामतीलोकसभा #baramatiloksabha  #loksabha2024 #elections2024 #निवडणूक #baramati #Pune



Post a Comment

0 Comments