Type Here to Get Search Results !

महायुतीच्या मेळाव्यासंदर्भात नियोजन बैठक भाजपा पुणे शहर कार्यालयात पार पडली!

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज


पुणे....

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बुधवार दि. ११ एप्रिल २०२४ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे लोकसभा महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्याची नियोजन बैठक भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहर कार्यालयात पार पडली. या बैठकीला उपस्थित राहून नियोजन बैठकीसंदर्भात चर्चा केली.




यावेळी भाजपाच्या पर्वती विधानसभा आमदार मा. माधुरीताई मिसाळ, पुणे शहराध्यक्ष श्री. धीरजजी घाटे, शिवसेना पुणे शहराध्यक्ष श्री. प्रमोद नाना भानगिरे, पुणे लोकसभा प्रभारी श्री. श्रीनाथ भिमाले, आरपीआयचे अध्यक्ष श्री. संजय सोनवणे, समन्वयक श्री. संदीप खर्डेकर, श्री. अजय बापू भोसले, श्री. किरण साळी यांच्यासह सर्व पक्षांचे अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


#नियोजन #बैठक #पुणे_लोकसभा #puneloksabha #election2024 #पुणे #मेळावा


Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे 

Ajit Pawar 

Devendra Fadnavis 

Sunetra Ajit Pawar 

NCPSpeaks_Official

Nationalist Congress Party, Pune City

Post a Comment

0 Comments