Type Here to Get Search Results !

दिग्गजांचा बहुजन समाज पार्टी मध्ये प्रवेश

 

    . _________________________                               पुणे दि. २५ - .बहन मायावती यांचे सोशल इंजिनिअरिंग करिश्मामुळे व देशाला खंबीर नेतृत्व देण्यासाठी तसेच त्यांना पंतप्रधान बनवण्यासाठी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून देणार असल्याचे बसपा चे महासचिव व मुख्य झोन प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी यांनी सांगितले .  


 पुणे येथे बहुजन समाज पार्टीमध्ये अनेक दिग्गजांनी प्रवेश केला यामध्ये आगरी कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील  ,  अग्निशमन दलाचे माजी प्रमुख प्रशांत रणपिसे , महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण उपसंचालक डॉ. रामचंद्र जाधव , राहुल ओव्हाळ यांचा समावेश आहे . सन 2019 मध्ये राजाराम पाटील व राहुल ओव्हाळ यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक लढवली होती यावेळी त्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त मते या मतदारसंघातून घेतली होती .राजाराम पाटील हे आगरी कोळी समाजाचे दिग्गज नेते असून त्यांचाही या ठिकाणी दांडगा संपर्क असून त्यांना यावेळी मावळ लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली प्रशांत रणपिसे यांना पुणे तर राहुल पवार यांना शिरूर लोकसभेचे उमेदवारी जाहीर करण्यात आली त्याचबरोबर शिर्डीतून डॉ. रामचंद्र जाधव तर अहमदनगर दक्षिण मतदार संघातून उमाशंकर यादव यांना यावेळी उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची माहिती डॉ.चलवादी यांनी दिली.

Post a Comment

0 Comments