अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे...
शिक्षणातून समाज परिवर्तनाचा पाया घालणारे थोर समाज सुधारक, डीसीएम सोसायटी ऑफ इंडिया या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक, शिक्षण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती कार्यक्रम अहिल्याश्रम 896 नाना पेठ पुणे येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष डी टी रजपूत साहेब हे होते विशेष उपस्थिती संस्थेचे जनरल सेक्रेटरी विशाल भाऊ शेवाळे साहेब हे होते. तसेच संस्था प्रतिनिधी-सौ काजलताई शेवाळे,वर्षाताई पाटील, मुख्याध्यापिका सौ शिल्पाताई भोसले,प्राचार्य डॉ. भारती सहस्रबुद्धे,डॉ.नरेश पोटे,वैभव इभाड,देशमुख सर,बर्डे सर,सुनिता भोसरेकर,डॉ.तेजपाल कांबळे,डॉ.प्रवीण कांबळे,प्रा.रणजीत देशमुख ,किशोर भुजबळ संस्थेतील शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी व उपस्थित होते.
डी टी रजपूत साहेब यांनी सांगितले की,महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृशता निवारणाचे,तसेच सामाजिक व शैक्षणिक प्रचंड काम हाती घेतले.समाजात शिक्षणाचा प्रसार घडवून आणणारे,अस्पृश्यांना नोकरीची संधी मिळवून देणे.त्यांच्या अडचणी सोडवणे,त्यांना चांगले शिक्षण देणे.त्यांच्या प्रगती आणि ज्ञानाची ताण निर्माण करणे यासाठी त्यांनी 18 ऑक्टोबर 1906 रोजी डिप्रेस्ड क्लासेस मिशन स्थापना केली.
अस्पृश्यता निवारणाचे,सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे शिलेदार महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे अफाट कार्य होते.
महर्षी विठ्ठल शिंदे यांनी सर्व समाजासाठी प्रचंड प्रमाणिक काम केले आहे.विशेषता तळागाळातील वंचित,दीन-दलीत,कष्टकरी,बहुजन वर्गासाठी त्यांनी अहो -रात्र प्रामाणिक परिश्रम घेतले आहेत म्हणूनच भारत सरकारने महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जयंतीच्या निमित्ताने संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना महर्षी विठ्ठल शिंदे यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य व कर्तुत्व माहिती व्हावे म्हणून संस्थेच्या सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये तसेच महाविद्यालयामध्ये विविध सांस्कृतिक,कला,क्रीडा स्पर्धां महोत्सव आयोजित केले होते सर्व विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्ताने विविध स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवणाऱ्या व विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.मधुकर धिवार यांनी केले सूत्रसंचालन डॉ. बाळासाहेब सोनवणे यांनी केले.ढोबे सर यांनी आभार मानले

Post a Comment
0 Comments