मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे दि. 18 - सर्वात चर्चेत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात बहुजन समाज पार्टीचे वतीने धनगर समाजाच्या ॲड. प्रियदर्शनी कोकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्या समवेत बसपाचे महाराष्ट्र मुख्य झोन प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी , पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी काळुराम चौधरी, ओबीसी नेत्या भुजबळ ताई ,पुणे शहर प्रभारी महंमद शफी ,अनिल त्रिपाठी व इतर पदाधिकारी उपस्थित होते . बारामती मतदारसंघात सध्या पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार असे वाटत होते परंतु कोकरे यांच्या उमेदवारीमुळे या ठिकाणी तुल्यबळ अशी तिरंगी लढत होऊन मोठी चुरस निर्माण झाली आहे या ठिकाणी धक्कादायक निकाल लागून प्रियदर्शनी कोकरे या मोठ्या फरकाने विजयी होतील . या मतदारसंघांमध्ये धनगर समाजाची जवळजवळ साडेचार लाख मतदार असून इतर समाजाची मते मोठ्या प्रमाणात बहुजन समाज पार्टीला मिळतील कोकरे यांनी झंजावती दौरे सुरू केले असून मतदारसंघ पिंजून काढण्यात सुरुवात केली आहे तसेच त्यांचे या मतदारसंघात त्यांचे प्राबल्य असून ओबीसी व बहुजन समाज समाजाची साथ त्यांना मिळत आहे दोन्ही पवारांना टक्कर देऊन त्या विजय होतील असे डॉ. हुलगेश चलवादी यांनी सांगितले . मा. संपादक , वरील बातमीस आपल्या लोकप्रिय वर्तमानपत्रातून प्रसिद्धी मिळावी ही नम्र विनंती . कळावे आपला विश्वासू हुलगेश चलवादी , मुख्य झोन प्रभारी महाराष्ट्र राज्य .
.jpg)
Post a Comment
0 Comments