मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे.. प्रतिनिधी...
गुरुद्वारा श्री गुरुसिंग सभा देहूरोड सिख यंग सर्कल पुणे आणि ऑल गुरुद्वारा पुणे जिल्हा यांच्यावतीने 325 व्या खालसा दिवस निमित्त खालचा टू व्हीलर रॅली आणि नगर कीर्तन रविवारी दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी दुपारी 12:30 वाजता श्री गुरुनानक दरबार कॅम्प येथून प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त झोन वनचे संदीप गिल व भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे जनरल सेक्रेटरी मुरलीधर मोहोळ च्या उपस्थितीमध्ये दुचाकी रॅली सुरू होणार आहे, पुढे बाटा चौक कॅम्प, कॉटर गेट चौक नाना पेठ, गणेश पेठ गुरुनानक सिंग सभा, लाल महल, महानगरपालिका शिवाजीनगर, ससून हॉस्पिटल, जय जवान नगर, दशमेश दरबार, यूपी हॉटेल खडकी, पुणे मुंबई रोड कासरवाडी, श्री गुरुनानक देवजी गुरुद्वार पिंपरी, मानसरोवर गुरुद्वार आकुर्डी येथून समारोप श्री गुरुसिंग सभा देहूरोड येथे होणार आहे, यावेळी देहू रोड श्री गुरुनानक गुरुद्वारामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे अखंड पाठ साहेब व किर्तन, भजन, शरबत वाटप, आणि लंगर (महाप्रसाद) इत्यादी कार्यक्रम होणार आहे,
कार्यक्रमाचे आयोजन सिख यंग सर्कल पुणे चे (अध्यक्ष) बलजीत सिंग वहादे, (उपाध्यक्ष) चरणजीत सिंग कोहिली, (जनरल सेक्रेटरी) गुरमुख सिंग कोहकर, वर्किंग प्रेसिडेंट दलजीत सिंग रँक, उपाध्यक्ष मनजीत सिंग वीरदी इत्यादींनी केले


Post a Comment
0 Comments