मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
मुंबई दि.३१ - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे महाराष्ट्रात महायुतीचे स्टार प्राचारक असून देशभरात राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए चे लोकप्रिय स्टार प्रचारक ठरले आहेत. त्यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्ष हा एन डी ए चा घटक पक्ष आहे. मित्रपक्ष भाजप आणि एन डी ए च्या घटक पक्षातील उमेदवार आपल्या प्राचारासाठी ना.रामदास आठवलेंच्या सभांचे आयोजन करीत आहेत.त्यासाठी देशभरातून भाजप आणि मित्रपक्षांचे उमेदवार ना.रामदास आठवलेंच्या तारखा मागत आहेत. लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल रोजी असून पहिल्या टप्प्यातील विविध उमेदवारांच्या प्रचारासाठी ना.रामदास आठवले येत्या दि.४ एप्रिल पासून देशभर दौरा करणार आहेत.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे येत्या दि.४ एप्रिल रोजी तामिळनाडूत कन्याकुमारी येथे प्रचार दौऱ्यावर रवाना होत आहेत त्यानंतर दि. ५ एप्रिल रोजी उत्तराखंड मधील डेहराडून येथे ना.रामदास आठवले भाजप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. दि.६ एप्रिल रोजी पाँडिचेरी या केंद्रशासित प्रदेशात लोकसभा निवडणूकित भाजप उमेदवाराच्या प्रचार सभांना ना. रामदास आठवले संबोधित करणार आहेत. दि.९ एप्रिल ला आसाम मध्ये ना. रामदास आठवले लोकसभा निवडणुकीत भाजप आणि रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. तसेच दि.१० एप्रिल ना.रामदास आठवले मणिपूर येथे प्रचार दौरा करणार आहेत.
दि.१२ एप्रिल ला महाराष्ट्रात नागपूर , चंद्रपूर, गडचिरोली येथे त्यानंतर दि.१३ एप्रिल ला भंडारा गोंदिया, रामटेक आणि नागपूर मध्ये महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार ना.रामदास आठवले करणार आहेत.
दि.१४ एप्रिल रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित सकाळी संसदभवनात आयोजीत कार्यक्रमात ना.रामदास आठवले उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी ते मुंबईत चैत्यभूमी येथे भीम जयंती निमित्त अभिवादनासाठी उपस्थित राहणार आहेत.
दि.१५ आणि १६ एप्रिल ला ना.रामदासआठवले महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांचा प्रचार करतील.त्यानंतर दि. १७ एप्रिल रोजी जयपूर राजस्थान जयपूर येथे भाजप उमेदवारांचा प्रचार ना.रामदास आठवले करणार आहेत.

Post a Comment
0 Comments