Type Here to Get Search Results !

भरत मित्रमंडळ महाशिवरात्र उत्सव समितीच्या वतीने महाशिवरात्र निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज


पुणे (दि.८) भरत मित्रमंडळ महाशिवरात्र उत्सव समितीच्या वतीने महाशिवरात्र निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. या मिरवणुकीत भगवान शंकर,नंदी महाकाळ,स्मशान अघोरी वेशभूषेतील कलाकार,ढोल पथके,वारकरी पथक आदी सहभागी होते. ही मिरवणूक मोदी गणपती – रमणबाग चौक आप्पा बळवंत चौक ते पुन्हा मोदी गणपती चौक येथे विसर्जित झाली. या मिरवणूक प्रसंगी अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर,निरंजन दाभेकर,अक्कलकोट अन्नछत्र मंडळ कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले,तेजस्विनी दाभेकर,अनिल येनपुरे, संदीप खर्डेकर, संदीप पाटील,नगरसेवक राजेश येनपुरे,रोहित टिळक,मुरलीधर मोहोळ,आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवर, मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.  

छायाचित्र : भरत मित्रमंडळ महाशिवरात्र मिरवणूक.

Post a Comment

0 Comments