मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे....प्रतिनिधी...
अखिल भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाच्या वतीने व सत्यशोधक बहुजन आघाडीच्या पाठिंब्याने,भारताचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नावाने MPSC,UPSC, १०वी, १२वी यांचे मोफत अभ्यासिका वर्ग व ग्रंथालय भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक कोरेगाव पार्क या ठिकाणी सुरू करावे या मागणी साठी पुणे महानगर पालिका ढोलेपाटील रोड क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त मा. इंद्रायणी करचे यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले.
यावेळी मा.आसिफभाई खान अखिल भारतीय भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, मा. संभाजी म्हस्के अध्यक्ष पुणे शहर युवक आघाडी , सत्यशोधक बहुजन आघाडी , मा.अरविंद भाऊ पाटोळे उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश सत्यशोधक बहुजन भटके विमुक्त जाती जमाती महासंघाचे उपाध्यक्ष हबीब भाई शेख तसंच युवा प्रदेश उपाध्यक्ष वसीम भाई शेख शब्बीर भाई नदाफ आघाडी इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments