Type Here to Get Search Results !

खाद्यपदार्थ निर्मिती क्षेत्रात महिलांना उद्योजकतेच्या संधी- स्मिता धुमाळ* *यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स संस्थेच्या महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सेंटर येथे बेकरी पदार्थ कार्यशाळा संपन्न*

 




मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज


*पुणे, दिनांक  : 08 फेब्रुवारी 2024 :* विविध प्रकार प्रकारच्या खाद्यपदार्थ निर्मिती क्षेत्रात युवती व महिलांना उद्योजकतेच्या अफाट संधी उपलब्ध आहेत, असे मत यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्सच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी व्यक्त केले. यशस्वी संस्थेच्या शिवाजीनगर येथील महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सेंटर येथे आयोजित बेकरी कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी प्रमाणपत्र वितरण करताना त्या बोलत होत्या.




यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, चॉकलेट, केक,बेकरी पदार्थ, स्नॅक्स सेंटर अशा विविध पद्धतीने महिला खाद्य निर्मिती क्षेत्रात आपले योगदान देऊ शकतात. तसेच खाद्य निर्मिती करताना पदार्थांची रुचकरता व पौष्टिक मूल्य काळजीपूर्वक जपल्यास त्याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभु शकतो असेही त्यांनी सांगितले. या प्रसंगी त्यांच्या हस्ते कार्यशाळेत सहभागी झालेल्या  विद्यार्थी- विद्यार्थिनींना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.




या कार्यशाळेत पदार्थ निर्मिती कौशल्या बरोबरच व्यवसाय करताना एखादी मोठी ऑर्डर प्राप्त झाल्यास निर्मिती खर्च व नफा हे लक्षात घेऊन  पदार्थाची नेमकी किंमत कशी काढावी, याबद्दल प्रशिक्षक गणेश साळवे यांनी मोलाचे मार्गदर्शन केल्याचे उपस्थित सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींनी  नमूद केले.


*फोटो  ओळ*

*१)* यशस्वी  एकेडमी फॉर स्किल्सच्या शिवाजीनगर  पुणे  येथील महाराष्ट्र  स्किल  डेव्हलपमेंट सेंटर  येथे  आयोजित  बेकरी पदार्थ कार्यशाळेच्या  समारोपप्रसंगी  विद्यार्थिनींना  प्रमाणपत्र  प्रदान  करताना  यशस्वी  संस्थेच्या संचालिका  स्मिता  धुमाळ, यावेळी  त्यांच्यासमवेत  प्रशिक्षक  गणेश  साळवे  व अन्य विद्यार्थी- विद्यार्थिनी. 

        

*२)* यशस्वी  एकेडमी फॉर स्किल्सच्या शिवाजीनगर  पुणे  येथील महाराष्ट्र  स्किल  डेव्हलपमेंट सेंटर  येथे  आयोजित  बेकरी पदार्थ कार्यशाळेच्या  समारोपप्रसंगी  विद्यार्थ्याला प्रमाणपत्र  प्रदान  करताना यशस्वी

संस्थेच्या संचालिका  स्मिता  धुमाळ, यावेळी  त्यांच्यासमवेत  प्रशिक्षक  गणेश  साळवे  व अन्य विद्यार्थिनी. 

 

*३)* यशस्वी  एकेडमी फॉर स्किल्सच्या शिवाजीनगर  पुणे  येथील महाराष्ट्र  स्किल  डेव्हलपमेंट सेंटर  येथे  आयोजित  बेकरी पदार्थ कार्यशाळेत  सहभागी  झालेले विद्यार्थी-विद्यार्थिनी, यावेळी त्यांच्यासमवेत    यशस्वी  संस्थेच्या संचालिका  स्मिता  धुमाळ व  प्रशिक्षक  गणेश  साळवे. 

 

*४)* यशस्वी  एकेडमी फॉर स्किल्सच्या शिवाजीनगर  पुणे  येथील महाराष्ट्र  स्किल  डेव्हलपमेंट सेंटर  येथे  आयोजित

 बेकरी पदार्थ कार्यशाळेत  सहभागी  झालेले  विद्यार्थी-विद्यार्थिनी,यावेळी  त्यांच्यासमवेत यशस्वी  संस्थेच्या संचालिका  स्मिता  धुमाळ व  प्रशिक्षक  गणेश  साळवे.

 

*५)* यशस्वी  एकेडमी फॉर स्किल्सच्या शिवाजीनगर  पुणे  येथील महाराष्ट्र  स्किल  डेव्हलपमेंट सेंटर  येथे  आयोजित  बेकरी पदार्थ कार्यशाळेच्या  समारोप प्रसंगी  चॉकलेटले विविध  प्रकार  सादर करताना  कार्यशाळेत  सहभागी  झालेले  विद्यार्थी- विद्यार्थिनी, यावेळी  त्यांच्यासमवेत  यशस्वी  संस्थेच्या संचालिका  स्मिता  धुमाळ व  प्रशिक्षक  गणेश  साळवे.


Post a Comment

0 Comments