मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे, दि. ६ फेब्रुवारी: महाराष्ट्र शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळ आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणेच्या वतीने सातवे राष्ट्रभक्ती साहित्य संमलेन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी भारतीय इतिहास संशोधक समितीचे सचिव पांडुरंग बलकवडे व स्वागताध्यक्षपदी डॉ. सुहास पायगुडे यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून शिवकालीन इतिहासाचे जाणकार पांडुरंग बलकवडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. हे संमेलन १४ फेब्रुवारी रोजी हडपसर येथील साधना विद्यालयात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे.
अधिक माहितीसाठी -
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे

Post a Comment
0 Comments