मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे ...... प्रतिनिधी,
*सासुबाईचा साखरपुडा..!हा नविन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज*
पुणे शहरात रस्त्यांवर अनेक रिक्षांची वाहतूक सुरू असते पण सध्या रिक्षांच्या पाठी असलेली "सासुबाईचा साखरपुडा" ही जाहिरात लक्ष वेधून घेत आहे.
कसली जाहिरात असावी याचा शोध घेतला असता हा मराठी चित्रपट असल्याचे समजले.
आजच्या तरूणींच्या उच्च परिवर्तनाने अनेक तरूणांचे साखरपुडा होण्याचे व पुढे लग्न होण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही पण सासुबाईचा साखरपुडा कसा होतोय ? का होतो ? या चित्रपटात नक्की कोणता विषय हाताळला असेल. तसे पाहता लग्नाआधीचा विधी म्हणजे साखरपुडा त्यानंतर लग्न हा तसा जीवनातील आनंदी तसेच भविष्यातील गंभीर घटना आहे अशा गंभीर विषयावर सासुबाईचा साखरपुडा म्हणजे विडंबन तर नाही ना ? की खरोखरच ही काळाची गरज आहे.
विभक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात आल्याने अनेक नातेसंबंधात अंतर पडत चालले आहे, आजी आजोबा यांच्या कडून नातवंडाना प्रेम मिळेनासे झाले आहे कारण हम दो हमारा एक अशीच कुटुंब पध्दती झाली आहे.
किंवा उतारवयात एखादे अपूर्ण प्रेमी जोडपे पुन्हा भेटत तर नाही ना? नक्की हा विषय काय असावा याचाच विचार सासुबाईचा साखरपुडा या चित्रपटाच्या बाबतीत येत आहे.
चौकशीअंती असे समजते की, हा मराठी चित्रपट लवकरच आपल्या शहरांत प्रदर्शित होत आहे.
तरी विषय समजून घेण्यासाठी एकदा हा चित्रपट नक्कीच पहायला हवा

Post a Comment
0 Comments