हिंदूह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय वस्ताद 2024 (बॉडी शो) स्पर्धेचे आयोजन*
*खासदार संजय राऊत, सचिन अहिर यांची प्रमुख उपस्थिती*
पुणे : हिंदूह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 'राज्यस्तरीय वस्ताद 2024' (बॉडी शो) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत (शिवसेना, ठाकरे गट), पुणे संपर्क प्रमुख आमदार सचिन आहीर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी संजय राऊत यांना 'वस्ताद' या किताबाने संन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे नेते बाळासाहेब भांडे यांनी दिली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सरपंच मयूर भांडे यांच्या वतीने एम. बी. फाऊंडेशनच्या माध्यमातून येत्या 18 फेब्रुवारीला शिव छत्रपती क्रीडा नगरी जवळ महाळूंगे, पुणे येथे संध्याकाळी 7 वाजता ही स्पर्धा होणार आहे. यावेळी पुणे शहरातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदाचंद्र पवार या पक्षातील नेते उपस्थित राहणार असल्याचे भांडे यांनी सांगितले.
Post a Comment
0 Comments