मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे प्रतिनिधी ....
श्रीगोंदा तालुका व नगरजिल्ह्याचे मातंग समाजाचे जेष्ठ नेते व नगर जिल्हा खादी ग्रामउद्योग संघाचे अध्यक्ष मा, भगवानराव गोरखे यांची मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा रमेशदादा बागवे यांच्या शुभहस्ते पुणे शहर येथील मुख्य कार्यालय येथे नियुक्तीचे पत्र त्यांना देण्यात आले.
यावेळी उपस्थित मा. अविनाशजी बागवे कार्याध्यक्ष मातंग एकता आंदोलन ( महा. राज्य ) मा. विठ्ठलजी थोरात पुणे शहर अध्यक्ष, मा. अरुणजी गायकवाड सेक्रेटरी महा. राज्य , मा. रमेशजी सकट संपर्क प्रमुख अहमदनगर जिल्हा, मा. दयानंद अडागळे उपाध्यक्ष मा. ए आं पुणे शहर , मा. सुनीलजी बावकर प्रदेश अध्यक्ष सोशल मीडिया व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.
सदरील कार्यक्रम मातंग एकता आंदोलनाचे पुणे येथील मुख्य कार्यालय येथे पार पडला.



Post a Comment
0 Comments