Type Here to Get Search Results !

सशक्त युवा, सशक्त भारताकरीता जाधवर ग्रुप तर्फे सातवी युवा संसद पुण्यात* जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूट, पुुणे तर्फे आयोजन महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा सहभाग ; संसदेकरीता मोफत प्रवेश

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज


पुणे : सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारताकरीता तरुणाईने पुढाकार घ्यावा तसेच युवा शक्तीला योग्य गती व दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांचे अधिष्ठान निर्माण करण्याकरीता पुण्यामध्ये सातव्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूट तर्फे रविवार, दिनांक २८ व सोमवार, दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी संस्थेच्या सभागृहात ही संसद होणार आहे. यामध्ये देशभरातील राजकारण, समाजकारण आणि विविध विषयांतील तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी महाराष्ट्रातील तरुणांना मिळणार आहे, अशी माहिती इन्स्टिटयूटचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 


संसदेकरीता विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून माजी खासदार राजू शेट्टी हे आयोजन समितीचे अध्यक्ष असणार आहेत. तर सुषमा अंधारे, राजेश पांडे, संजय आवटे, मेघराज भोसले, राहुल कराड, प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, अ‍ॅड.शार्दुल जाधवर हे कार्यकारणीमध्ये आहेत.

 

महाराष्ट्रातून सुमारे १५०० हजार विद्यार्थी संसदेत सहभागी होणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी संसदेत सहभागी होणार आहेत. पुणे, सोलापूर, अकोला, कोल्हापूर, मराठवाडा, कोकण यांसह विविध भागांतून विद्यार्थी संसदेकरीता पुण्यामध्ये येणार आहेत.

 


अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशा विविध विषयांवर संसदेत चर्चा होणार आहे. वयवर्षे १६ ते ४० मधील तरुणांनी संसदेत सहभाग घ्यावा. संसदेत सहभागी होण्याकरीता मोफत प्रवेश असून विद्यार्थीनींची एक दिवसाची पुण्यामध्ये राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात येणार आहे.

 

विद्यार्थ्यांनी संसदेतील सहभागाकरीता मो. ९०७५३४४२७६ या क्रमांकावर संपर्क साधावा आणि  https://forms.gle/ky3EmkTW8np7mwwT9  या लिंकवरून फॉर्म भरावा. त्यानुसार विद्यार्थ्यांची नोंदणी होणार आहे. संसदेच्या माध्यमातून युवकांनी राजकारण आणि समाजकारणातील दिग्गजांसोबत संवाद साधावा, हा यामागील मुख्य उद्देश आहे. संसदेकरीता प्रवेश विनामूल्य आहे, तरी तरुणाईने मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले.

Post a Comment

0 Comments