मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
ठाणे.....प्रतिनिधी...
गायनाच्या दुनियेत स्वतःला सिद्ध कारण्यासाठी खूप गायक छोट्या पासून मोठे कलाकार प्रयत्न करत असतात पण वय वर्ष 21 असलेली टिशा कुळकर्णी हिने आपल्या गाण्यातून चांगलीच छाप सोडली. नुकताच पार पडलेला ठाणे येथील लोढा गृहसंकुलात अय्यप्पा पूजेतील कार्यक्रमामध्ये तिने मल्याळम या भाषेत शिवशक्ती गीत गाऊन अनेकांची मने जिंकली आहेत.
सूंदर आवाज मधुर गाणं याच गाण्याने लोकांना भारावून सोडलं आहे टिशा हि महाराष्ट्रातील मराठी मुलगी ठाणे या ठिकाणी राहते आपल्या गाण्यातून तिने देशभरातील केरळी समाजात छाप सोडली आहे नुकतेच Facebook मधील मल्याळम वाहिनीच्या आपली मुंबई पेजवर तिचे गाणे प्रसिद्ध झाल्यापासून देशभरातुन केरळीय समाजाकडुन तिचे विशेषतः कौतुक केले जात आहे. तिच्या गाण्याला भरभरून पसंती दिली जात आहे.

Post a Comment
0 Comments