Type Here to Get Search Results !

व्यसनमुक्त भारताकरिता 'दारु सोडा, दूध प्या' जनजागृतीने नववर्षाचे स्वागत जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूट, सिंहगड रोड पोलीस स्टेशन आणि लायन्स क्लब आॅफ पुणे पर्ल तर्फे अभियानाचे आयोजन

 

मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज


व्यसनमुक्त भारत झालाच पाहिजे...शराब पीना छोड दो, अपना जीवन मोड दो...नशे से दोस्ती, जीवन से मुक्ती... हम सबका है यही सपना, नशामुक्त हो देश अपना... अशा घोषणा देत जनजागृतीच्या माध्यमातून व्यसनाधिनतेच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखविण्याकरीता महाविद्यालयीन तरुणाईने पुढाकार घेतला. व्यसनमुक्त भारताकरिता दारु सोडा, दूध प्या असा संदेश देत तरुणाईसोबत शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी, पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील दूध वाटप केले.




सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाखालील चौकामध्ये जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूट्, सिंहगड रोड पोलीस स्टेशन आणि लायन्स क्लब आॅफ पुणे पर्ल यांच्या संयुक्त विद्यमाने दारु सोडा, दूध प्या अभियान राबविण्यात आले. यावेळी आमदार भीमराव तापकीय, सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण जाधव, राहुल यादव, उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, माजी नगरसेवक प्रसन्न जगताप, सामाजिक कार्यकर्ते शिवाभाऊ पासलकर, भुपेंद्र मोरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते.




संस्थेतील महिला शिक्षिका व विद्यार्थीनींनी प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल  न-हे येथे, इंद्रप्रस्थ क्रान्तीनगर वडगाव बुद्रुक आणि मुख्य कार्यक्रम वडगाव ब्रिज सिंहगड रस्ता येथे पार पडला. उपक्रमाचे यंदा १० वे वर्ष होते. 


Post a Comment

0 Comments