मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे -पुणे व पिंपरी चिंचवड येथील व्यापारी लोकांना तसेच त्यांच्या परिवारास एकत्र घेऊन स्थापन करण्यात आलेल्या द एस क्लब च्या वतीने नेहमीच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते त्या पैकी सर्वांच्याच आवडीचा क्रीडा प्रकार म्हणजे क्रिकेट त्या मुळे गेली दहा वर्षे क्लब कडून एस क्रिकेट लीग चे आयोजन करण्यात येते. ज्या मधे पुरुष आणि महिला उत्साहाने सहभागी होतात. 11 जानेवारी 2024 रोजी पुना क्लब च्या मैदानावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते क्रिकेट लीग चे उद्घाटन करण्यात आले. या वेळी नगरसेवक रघुनाथ अण्णा गौडा, क्लब चे संस्थापक उद्योजक नरेश मित्तल, लीग चे चेअरमन अमित गुप्ता, एस क्लब चे अध्यक्ष दिलीप गुप्ता आणि लीग चे सचिव आनंद मित्तल उपस्थित होते.
८४ पुरुष तर ३९ महिला संघ या चार दिवसीय क्रिकेट लीग मधे सहभागी झाले असून रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी दुपारी चार वाजता सामन्याचा बक्षीस वितरण सोहळा होणार आहे. विजयी संघास चषक तर प्रत्येक सहभागी खेळाडूस विजयचिन्ह देण्यात येणार आहे. अमन किया रायडर्स, मीरा ह्युंदाई युनायटेड, लिनीआ वॉरियर्स, सत्यम रायझर्स, एलिट स्ट्रायकर्स,महाफास्ट चॅम्प्स, के - लाइन लेडी फाल्कन्स आणि एटी ॲव्हेंजर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला. एस क्रिकेट लीगचे आयोजन 11 ते 14 जानेवारी 2024 दरम्यान पुण्यातील पुणे क्लबच्या क्रिकेट ग्राउंड वर करण्यात आले आहे.


Post a Comment
0 Comments