मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे, दत्ता सुखदेव हजारे, प्रतिनिधी,
एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला कार्यकर्ता ते पक्षीय कामांमध्ये विविध पदावर काम करीत असताना कुठेतरी माझे गुरुवर्य माजी खासदार गिरीश बापट साहेब यांची आठवण येऊन जाते. शालेय जीवनात असल्यापासून भारतीय जनता पार्टीची आवडू लागली ती बापट साहेबांमुळेच.
पुण्यातील एसपी कॉलेज येथे ६ मार्च २००६ रोजी भाजपा युवा मोर्चाची सर्वप्रथम शाखा सुरू करून त्या शाखेचा उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. तसेच पुढे जाऊन शिरूर तालुका विद्यार्थी मोर्चाचा अध्यक्ष ते शिरूर तालुका युवा मोर्चाचा उपाध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष होण्याचा मान मला मिळाला.
संघटनेत अशा विविध पदावर काम करता करता वाजेवाडी मांजरेवाडी या माझ्या गावातील ग्रामपंचायती मध्ये उपसरपंच म्हणून काम करता आले. माझ्या त्या काळात मी वाजेवाडी मांजरेवाडी गावचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि तत्कालीन खासदार स्व. गिरीशजी बापट साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणत निधी आणून गावाच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रणामत बदल घडवून आणू शकलो. तसेच सध्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून गावच्या विकासामध्ये काम करण्याची संधी मिळाली.
खासदार दत्तक योजने अंतर्गत त्या वेळी गावातील सर्व रस्ते, पथदिवे आणि इतर संदर्भातील सर्व कामांसाठी जवळपास 20 ते 25 कोटीची कामे या करण्यात आली.
हे सर्व करत असताना भारतीय जनता पक्षाने मला भक्कम आधार दिला. वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. मी ही पक्षाच्या कार्याला स्वतःला वाहून घेतलं. माझ्या याच कामाचे पक्षाने कायमच कौतुक केले.
आज महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील तसेच भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष शरदजी बुट्टे पाटील व राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे व पुणे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप आबा सातव यांनी माझी पक्षाच्या पुणे जिल्हा (युवा मोर्चा) सरचिणीसपदी निवड केली. ही जबाबदरी आव्हानात्मक जरी असली तरी पक्षाच्या शिस्तीचा मला कायमच फायदा झाला आहे. त्यामुळे ही जबाबदारी सुद्धा मी जबाबदारीने पार पाडेल यांचा विश्वास आहे.
त्यावेळी माजी आमदार बापूसाहेब पठारे, माजी उपाध्यक्ष पुणे जिल्हा परिषद आणि शिरूर- हवेली निवडणूक प्रमुख श्री प्रदीपदादा कंद, क्रीडा प्रकोष्टचे प्रदेश संयोजक पै. संदीपआप्पा भोंडवे, उत्तरच्या प्रभारी प्रा. निवेदिता एकबोटे, रोहिदासशेठ उंद्रे पाटील, आबासाहेब सोनवणे, श्यामभाऊ गावडे, व माझे सहकारी मित्र नवनाथ जी खांदवे तसेच माझ्यावर प्रेम करणारे माझ्या जवळचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थीत होते. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments