Type Here to Get Search Results !

यशस्वी' संस्थेच्या विद्यार्थ्यांची पुणे पुस्तक महोत्सवाला भेट

 




मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज


*पुणे  : दिनांक  २२ डिसेंबर  २०२३* :   पुण्यातील  फर्ग्युसन  महाविद्यालयाच्या  मैदानावर आयोजित पुणे  पुस्तक  महोत्सवाला  यशस्वी एज्युकेशन  सोसायटीच्या इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेंट  सायन्स (आयआयएमएस ) च्या  एमबीए  व एमसीए च्या विद्यार्थ्यांनी भेट  दिली.




या  भेटीपूर्वी संस्थेचे  संचालक  डॉ. शिवाजी मुंढे  यांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  करताना  सांगितले की, या पुस्तक  प्रदर्शनाला भेट  दिल्यामुळे  साहित्यविश्वाच्या वैविध्यतेची  ओळख  विद्यार्थ्यांना  होईल  आणि  अवांतर  वाचनाचीही  गोडी  त्यांना  लागेल या उद्देशाने  या भेटीचे  आयोजन करण्यात आले.  या प्रदर्शनातील  विविध  भाषांच्या  पुस्तकांच्या स्टॉल्सला  विद्यार्थ्यांना भेट  दिली, यावेळी  उपस्थित असलेल्या संस्थेच्या  अध्यापक वर्गाने विद्यार्थ्यांना  पुस्तक खरेदी करताना मार्गदर्शन  केले. विविध प्रकाशन संस्था, त्यांची  प्रकाशने, तसेच पुस्तक  प्रदर्शनाची  आकर्षक  सजावट, व्यवस्थापन    याशिवाय विविधांगी  विषयांवरील वाचनीय  पुस्तके हे सगळे ज्ञानभंडार जवळून  पाहता  आल्याबद्दल समाधान व्यक्त करीत  हा अनुभव  खूप  समृद्ध  करणारा  ठरला  असे  मत विद्यार्थ्यांनी  व्यक्त केले.     

यावेळी  विद्यार्थ्यांसमवेत  डॉ.वंदना मोहंती, डॉ.पुष्पराज वाघ, प्रा.गंगाधर डुकरे, प्रा.महेश महांकाळ, प्रा.निशांत पाचपोर, प्रा.प्रशांत वाडकर, प्रा.युगंधरा, प्रा.नितीन गणेशर आणि ग्रंथपाल महेंद्र कांबळे उपस्थित  होते.  



*फोटो  ओळ*  :

पुण्यातील पुस्तक  महोत्सवाला  भेट  दिल्यानंतर  आनंद  व्यक्त करताना यशस्वी एज्युकेशन  सोसायटीच्या इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेंट  सायन्स (आयआयएमएस )चे  एमबीए  व एमसीए   विद्याशाखेचे विद्यार्थी  व त्यांच्यासमवेत डॉ.वंदना मोहंती, डॉ.पुष्पराज वाघ, प्रा.गंगाधर डुकरे, प्रा.महेश महांकाळ, प्रा.निशांत पाचपोर, प्रा.प्रशांत वाडकर, प्रा.युगंधरा, प्रा.नितीन गणेशर आणि ग्रंथपाल महेंद्र कांबळे.

        


                   

Post a Comment

0 Comments