मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चित्रपट आघाडीचा नवनियुक्त पदाधिकारी नियुक्ती पत्र प्रदान समारंभ तसेच नवनियुक्त प्रदेश कार्यकारीणीची बैठक सोमवार दि. ११ डिसेंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी कार्यालय, नरीमन पॉईंट, मुंबई येथे पार पडली. सदर कार्यक्रमास श्री. विक्रांतजी पाटील, सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांची विशेष उपस्थिती होती. मा. विजयभाऊ हरगुडे प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश यांनी यावेळी नवनियुक्त कार्यकारीणीला विशेष मागदर्शन केले. श्री. समीर दीक्षित अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी चित्रपट आघाडी यांनी याप्रसंगी नवनियुक्त कार्यकारीणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सुप्रसिद्ध दिग्दर्शक एन. चंद्रा, अभिनेत्री किशोरी शहाणे, नाटक निर्माते व समाजसेवक अनंत पणशीकर, दिग्दर्शक रमेश मोरे, निर्माते दीपक रुईया, अभिनेते कासम अली, डिझायनर आत्मानंद गोलतकर, निर्माते-आयटी प्रोफेशनल सचिन पैठणकर, चित्रपट कामगार कायदा सल्लागार अजय पाटोळे, निधी सल्लागार सदानंद शेट्टी, कायदातज्ज्ञ जुबी मॅथ्यू, प्रभारी श्री. सत्यवान गावडे, सरचिटणीस प्रीति जोसेफ विक्टर, सरचिटणीस गीतांजली ठाकरे, सरचिटणीस संचित यादव, श्री. शौकतखा रज्जाकखा पठाण, चंद्रकांत विसपुते, शिरीष राणे इ. मान्यवर मंडळी उपस्थित होती. धनश्री दामले यांनी या कार्यक्रमाचे सुंदर निवेदन केले. याप्रसंगी अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाडीमध्ये प्रवेश केला. अभिनेत्री किशोरी शहाणे यांची वरीष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.


Post a Comment
0 Comments