Type Here to Get Search Results !

समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान "वर्ल्ड मस्ती डे" निमित्ताने श्रावी मीडियाच्या वतीने आयोजन, सुमधूर गाण्यांची बरसात

 

मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती आहे


पुणे - समाजाच्या विविध क्षेत्रात सर्वोत्तम कार्य करून समाजाच्या प्रगतीसाठी सातत्याने काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. वर्ल्ड मस्ती डे निमित्ताने श्रावी मीडिया अँड फिल्म प्रॉडक्शन व एमजे असोसिएटस् च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले उपस्थित होते.

या पुरस्कार सोहोळ्यात श्रावी समाजसेवाश्रेष्ठ विभूषण जीवनगौरव पुरस्कार - शांताराम बी. जाधव, श्रावी कलाश्रेष्ठ विभूषण पुरस्कार - चंद्रशेखर महामुनी, श्रावी आरोग्य संशोधनश्रेष्ठ विभूषण पुरस्कार - विनय प्रमोद हिबारे,श्रावी आरोग्य सेवाश्रेष्ठ विभूषण पुरस्कार - प्रदीप निकम, श्रावी युवा उद्योगश्रेष्ठ विभूषण पुरस्कार - जयेश राजेन्द्र गायकवाड यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 



अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आपल्या भाषणात म्हणाले की, समाजातील वेगवेगळ्या व्यक्तींना काम करत असताना अशा पुरस्कारामुळे सन्मानित केल्याने भविष्यात काम करण्याची उर्मी येते. त्याचबरोबर नवीन गायकांना स्टेज मिळावा हा प्लॅटफॉर्म "वर्ल्ड मस्ती डे" च्या माध्यमातून गायकांनी सादर केला हे महत्त्वाचे आहे, आरोग्याच्या दृष्टीने संगीत हा महत्त्वाचा भाग आहे हे या श्रावी मीडिया अँड फिल्म प्रॉडक्शन व एमजे असोसिएटस् या आयोजकांच्या संस्थेने जपले आहे.

जीवन गौरव पुरस्कार प्राप्त शांताराम जाधव म्हणाले की या पुरस्कारामुळे मला काम करण्याचा हुरूप वाढला आहे व या माध्यमातून समाजासाठी दुप्पट शक्तीने काम करण्याची ऊर्जा मला प्राप्त झाली आहे.


यानिमित्ताने राॅकस्टार ते सुपरस्टार हा सुमधूर गाण्यांचा कार्यक्रम पार पडला. या वेळी गायक प्रशांत निकम, आदिती कुलकर्णी, वंदना ढाके, सुजाता माळवे, उमा मेनन, विनायक कदम, अनिल घाडगे यांनी एकाहून एक सरस गाणी सादर केली. या कार्यक्रमाला रसिक पुणेकरांचा प्रचंड प्रतिसाद प्राप्त झाला. सर्व पुरस्कर्त्यांनी या वेळी पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पाच वर्षांच्या चिमुकल्या श्रावीने गायलेल्या गाण्याने सर्वांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष गोखले आणि रिया धेंडे यांनी केले, तर श्रावी मीडियाचे संचालक विवेककुमार तायडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

या सोहळ्यासाठी मणीराम गुप्ता, एस एस तायडे सर, गोरक्षनाथ गरड, स्वाती गरड, स्वामी हिमांशू, करूणा पाटील, सुधीर देशमुख, विशाल रायकर, शिवराज हाईट्स सोसायटी मधील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments