मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
*पुणे :दिनांक 21 नोव्हेंबर 2023*:यशस्वी एकेडमी फॉर स्किल संस्थेच्या विद्यार्थिनींनी यंदाच्या दिवाळी उत्सवात दिवाळी फराळ पदार्थ विक्रीतून तब्बल पाच लाख पंधरा हजार रुपयांची कमाई केली आहे. 'यशस्वी' संस्थेतून पारंपरिक खाद्यपदार्थ प्रशिक्षण (ट्रॅडिशनल फूड) घेतलेल्या संगीता अष्टेकर, चारुशीला कांबळे, सोनाली मोकाशी, कविता जैन, सुवर्णा कुदळे, संध्या धिवार, नेहा पाटील व मीनाक्षी धोत्रे या आठ विद्यार्थिनींनी चिवडा, चकली, लाडू, शंकरपाळे असे दिवाळी फराळाचे पदार्थ तयार करून त्यांच्या विक्रीतून सुमारे पाच लाखाहून अधिक रुपयांचा व्यवसाय केला.
यामध्ये संगीता अष्टेकर यांनी दोन लाख दहा हजार, चारुशीला कांबळे यांनी नववद हजार, सोनाली मोकाशी, सुवर्णा कुदळे व संध्या धिवार या तिघींनी प्रत्येकी पन्नास हजार रुपये तर कविता जैन यांनी पंचवीस हजार आणि नेहा पाटील व मीनाक्षी धोत्रे यांनी प्रत्येकी वीस हजार रुपयांची कमाई दिवाळी फराळ विक्रीतून केली. बाजारात अगदी पॅक फूड स्वरूपात वेगवेगळ्या प्रकारचा दिवाळी फराळ उपलब्ध असताना सुद्धा घरगुती व पारंपरिक पद्धतीने बनविलेल्या दिवाळी फराळ पदार्थांना तितकीच मागणी असून दिवाळी उत्सवाच्या काळात आपण घेतलेल्या प्रशिक्षण कौशल्याचा योग्य पद्धतीने वापर करीत या विद्यार्थिनींनी दिवाळी फराळ विक्रीतून स्वयंरोजगाराची वाट अधिक भक्कम केली आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये त्यांच्या घरातील सर्व सदस्यांनीही त्यांना मोलाची मदत केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. विशेष बाब म्हणजे यापैकी काही विद्यार्थिनींनी तयार केलेला फराळ थेट परदेशातील ग्राहकांनाही पाठवण्यात आला.
तर महिलांना दिवाळी फराळ बनवता येतच असतो मात्र त्याचा व्यवसाय करताना पदार्थांचे प्रमाण वाढल्याने नेमका अंदाज किती घ्यावा, पदार्थांचा रुचकरपणा कसा टिकवावा याबद्दलची सविस्तर माहिती प्रशिक्षणातून देण्यात येते,
तसेच सुरुवातीच्या काळात व्यावसायिक ऑर्डर कशा प्रकारे हाताळाव्यात याबद्दल संस्थेतील प्रशिक्षक ईशा फाटक व गणेश साळवे यांचेही मार्गदर्शन विद्यार्थिनींना होत असते. त्यामुळे विद्यार्थिनींमधील उद्योजकीय कौशल्य वाढीस लागते असे मत 'यशस्वी' संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी व्यक्त केले.
*फोटो ओळ* : यशस्वी एकेडमी फॉर स्किल संस्थेच्या दिवाळी फराळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या यशस्वी एकेडमी फॉर स्किल संस्थेच्या विद्यार्थिनी. त्यांच्यासमवेत यशस्वी संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ, संस्थेचे प्रशासन विभाग प्रमुख प्रसाद शाळीग्राम, संस्थेच्या प्रशिक्षिका ईशा फाटक, प्रशिक्षक गणेश साळवे, समुपदेशिका शुभांगी कांबळे.
*अधिक माहितीसाठी संपर्क*
योगेश रांगणेकर मो : 7350014536 / 9325509870
ज्ञानेश्वर गोफण ( माऊली) मो : 7620603256 / 7083474883

Post a Comment
0 Comments