Type Here to Get Search Results !

शिखा यांचे हस्तकला प्रदर्शन म्हणजे मानवी जीवनाचे भावविश्व* *शिखा यांच्या प्रदर्शनातून नवोदित महिला उद्योजकांना मिळणार प्रेरणा*

     


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज



    शिखा यांनी आपला  छंद जोपासून मानवी पारंपरिक कला आणि संसकृतिचे दर्शन घडवत दैनंदिन गृहउपयोगी वस्तू,वस्त्रे आदिच्या हस्तकलाकृतिंचे प्रदर्शन पुण्यात भरविले आहे.शिखा यांचे हे  प्रदर्शन पाहत असताना कलाजगतातील विश्व, मानवी जीननातील भाव-भावना, संस्कृतिची जोपासना करत त्यांनी नित्याच्या दैनंदिन जीवनातील वापरात येणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंना आगळे-वेगळे रूप दिले आहे ,याची अनुभूती आपल्याला या प्रदर्शनातून नक्कीच पाहावयास मिळते.    

 त्यांनी आपल्या कला आणि छंद जोपासत बनविलेल्या आगळ्यावेगळ्या  हस्त मुद्रीत उशांच्या खोळी, शयन कक्षात असलेल्या पलंगांची शोभा वाढवणारी कलाकृती, शिका यांच्या   हस्तकला कारागिरी   प्रदर्शनातील एक  उतम   कलेचा नमुना प्रदर्शनात पाहवयास मिळेल.



शिखा यांच्या या पारंपरिक कलाकृती वस्तूचे प्रदर्शन  पुण्यातील वास्सुप फ्ली मार्केटमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात निसर्गातील 'अग्नी-वर्षा' या दोन घटकांचा प्रत्यय आणि अनुभूती पाहवयास मिळते.   यात,हस्त रंगकाम केलेले शूज अग्णी-वर्षा या निसर्ग घटकाचे प्रतिनिधित्व करतात, या प्रदर्शनात हस्तकलेच्या माध्यमातून  रंगकाम केलेल्या साड्या, मफलर, कंपन्यांसाठी कंपनी लोगो असलेले टॉय किंवा बॉस असे लिहिलेले शर्ट या शिवाय अत्यंत सूदर आणि सुबक डिझाईन केलेली उत्पादने तसेच रंगकाम केलेली उत्पादने या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आली आहेत.

श्रीमती शिका अजमेरा या महिला उद्योजकाची उत्साही आणि मेहनती अशा स्वरूपाची कलाकृती आपल्याला या प्रदर्शनात दिसून येते. त्यांच्या मते, हस्तकला आणि पेंटिंग हे  अनादी काळापासून विशिष्ट पूर्ण कलाकृती ठरले आहेत पेंटिंग यातून आपल्याला त्या त्या काळातील संस्कृती मानवी सभ्यता आणि त्यांच्या परंपरा यांचा बोध होतो. म्हणून हस्तकला पेंटिंग या कलाकृती या केवळ कौशल्यापुरत्या मर्यादित नसून त्यातून विविध मानवी संस्कृती- परंपरा यांचे दर्शन होते.



शिखाची हस्तकला कारिगिरी हे केवळ वस्तूंचे प्रदर्शन नसून यामध्ये विविध प्रकारच्या भावनांचा समावेश देखील शिका अजमेरा यांनी केलेला आहे, त्यांच्या मते आपण जेव्हा एखादी वस्तू भेट म्हणून  देतो, त्यामध्ये आपल्या भावनां,आदर आणि आपूलकीचा समावेश असतो, म्हणून त्या वस्तूंमध्ये देखील त्या भावनांची प्रतीकात्मकता यायला हवी या दृष्टीने त्यांनी हे प्रदर्शन भरवलेले आहे. याबाबत अधिक माहिती देताना श्रीमती अजमेर असं म्हणतात की, याची सुरुवात 2022 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी करण्यात आली होती. त्यानंतर याचा आता आणखी विस्तार होत आहे. श्रीमती शिका अजमेरा यांना हस्तकला आणि पेंटिंग याविषयीची आवड सुरुवातीपासूनच होती, आता या माध्यमातून त्यांनी त्यांच्या कलेचे मूर्त रूप प्रदर्शनाच्या माध्यमातून पुढे आणले आहे. त्यांच्यामध्ये आपल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी हे एक चांगले माध्यम आहे असे त्या म्हणतात. श्रीमती शिका अजमेरा या गृहिणी असून त्यांचे पती आणि दोन मुले यांच्या समवेत ते आपल्या सुप्त गुणांना पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत.

आपल्या कुटुंबाला संपूर्ण वेळ देणाऱ्या  महिला उद्योजकांसाठी हे प्रदर्शन प्ररणादायी आहे. हे प्रदर्शन केवळ आपले छंद जोपासण्याइतकेच मर्यादित नसून  उद्याच्या उद्योग विस्ताराची   अपेक्षा या सारख्या प्रदर्शनांमधून आणि कलाकृतींच्या प्रोत्साहनातून साकास होते.  अशा कलाकृतीतून  रोजगार निर्मिती होईल आणि गरीब आणि होतकरू कलाकारांना कामही मिळेल, त्यामुळे श्रीमती शिका अजमेरा यांचा हा प्रयत्न नक्कीच भविष्यामध्ये सर्वांना प्रोत्साहन देणारा  आणि प्ररणादायी ठरणार आहे.


Post a Comment

0 Comments