Type Here to Get Search Results !

वाजेवडी गावातील तरुणांनी मिरवणुकीचा खर्च वाचवून मतिमंद व अनाथ मुलांना केले वस्तूंचे वाटप.......एक आदर्श उपक्रम

 मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज


लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेश उत्सव चालू केला तोच आदर्श ठेवून आमच्या मंडळांनी गेली दहा दिवस श्रींची मनोभावी पूजा अर्चा केली .



आजच्या तरुणांच्या पुढे एक आदर्श निर्माण करण्यासाठी धर्मवीर संभाजी राजे मित्र मंडळ वाजेवाडी व सणसवाडी येथील ऑलिकॉन कामगार संघटना गणेश उत्सव मंडळाने गणपती बाप्पाचे विसर्जन हे आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार करण्याचे ठरवले. आमच्याच वाजेवाडी गावातील सेवाधाम मतिमंद मुलांच्या शाळेमध्ये जाऊन डीजे व मिरवणुकीचा खर्च वाचवून त्या शाळेतील गरजेनुसार त्यांना वस्तू देण्याचा विचार केला.


आपल्या गणपती बाप्पा समोरच आपणच वेगळी गाणी वाजवत वेड्यावाकड्या पद्धतीत नाचत असतो त्याला कुठेतरी आळा बसावा व आपली हिंदू संस्कृती इथून पुढील सर्व तरुणांनी जपावी ह्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांनी अशा पद्धतीने विसर्जन सोहळा पार पाडण्याचे ठरवले. 



येथून पुढील उत्सव देखील अशा प्रकारे करण्याचा निर्णय  दोन्ही मंडळांनी घेतला. 


यावेळी सेवाधाम संस्थेचे प्रमुख पवन सर कटारमल, कामगार संघटनेचे अध्यक्ष दत्ता तांबे, श्री गणेश मंडळ अध्यक्ष श्री सचिन जगताप उपस्थित होते. 


तसेच धर्मवीर संभाजी राजे मित्र मंडळाचे सर्व जेष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच संस्थापक अमित भाऊ तानाजी सोनवणे,

सत्यमदादा संदीप सोनवणे (अध्यक्ष)

खुशाल तात्या सोनवणे (उपाअध्यक्ष)

गौरवराजे गायकवाड (कार्याध्यक्ष)

सुमित गुंजाळ (उपकार्याध्यक्ष)

वैभव सोनवणे (खजिनदार)

अभिजित सोनवणे (सचिव)

रोहन सोनवणे (आयोजक)

सौरव सोनवणे (उत्सव प्रमुख)

कमलेश बेंडभर (आयोजक)

हेमंत भोर (नियोजन प्रमुख)

अर्थव रिठे (संयोजक)

आदेश भोर (सदस्य)

केतन धनावडे (सदस्य)

आदित्य रिठे (सदस्य)

हर्षवर्धन सोनवणे (सदस्य)

महेश सोनवणे (सदस्य)

आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments