मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीचे सदस्य श्री ह भ प ज्ञानेश्वर महाराज जळगावकर. व श्री ह भ प विठ्ठल महाराज वासकर. यांची नाना पेठ येथील डीसीएम सोसायटी अहिल्याश्रमला सदिच्छा भेट देण्यात आली.
यावेळी डीसीएम सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष डी टी राजपूत सर यांच्या हस्ते श्री ह भ प ज्ञानेश्वर महाराज जळगावकर व श्री ह भ प विठ्ठल महाराज वासकर यांना शाल श्रीफळ आणि विठ्ठलाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी डीसीएम सोसायटीचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे. संस्थेचे विश्वस्त डॉक्टर अमित रजपूत. सुरेश अवचिते. ह भ प अशोक कासुळे. संदीप अवचिते आदि यावेळी उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या संपूर्ण कार्याची माहिती समितीचे सदस्यांनी जाणून घेतली व डीसीएम संस्थेला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या


Post a Comment
0 Comments