जी २० इंटरफेथ समिट’ चा समारोप
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी पुणे, जी २० इंटरफेथ अलायन्स फॉर सेफर कम्युनिटीज आणि यूएसए येथील जी २० इंटरफेथ फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जी २० इंटरफेथ समिट’चा समारोप समारंभ गुरुवार दि. ०७ सप्टेंबर २०२३ रोजी सायं. ५.०० वा. तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर विश्वशांती घुमट, विश्वराजबाग, लोणी-काळभोर, पुणे येथे होणार आहे.
या समारंभासाठी प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जी २० इंटरफेथचे अध्यक्ष डब्ल्यू कोल ड्यूराम ज्यू., टेक्सास ए अॅड एम विद्यापीठाचे माजी अध्यक्ष मायकेल के.यंग, हरियाणाचे राज्यपाल मा.श्री. बंडारू दत्तात्रेय, मजदूर किसान शक्ती संघटनेच्या संस्थापिका श्रीमती अरूणा रॉय हे असतील. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तसेच कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड हे उपस्थित राहणार आहेत.
Post a Comment
0 Comments