Type Here to Get Search Results !

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे विविध भागात जनसंवाद यात्रा






पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे विविध भागात जनसंवाद यात्रा काढून लोकांशी संपर्क साधत आहे. या अंतर्गत सोमवार दि 11 सप्टेंबर 2023 रोजी सांयकाळी 4 वाजता छत्रपती शिवाजी नगर ब्लॉक ,बोपोडी ब्लॉक,खडकी ब्लॉकच्या वतीने चिखल वाडी बुद्ध विहार येथून जनसंवाद पद यात्रा सुरु करुन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर रोडने  स.नं. 24,25,26 मार्गे चांदणी चौक बोपोडी व डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत जनसंवाद पद यात्रा काढण्यात आली . 



रात्री 8 वाजेपर्यंत पदयात्रा सूरु होती. यावेळी  अरविंद शिंदे (अध्यक्ष पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी), रमेशदादा बागवे (उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस), अड. अभय छाजेड (सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश), दिप्तीताई चवधरी (माजी आमदार) , कमलताई व्यवहारे (माजी महापौर),  रजनीताई त्रिभुवन (माजी महापौर),  लताताई राजगुरू (माजी नगरसेविका), विनोद रणपिसे (सरचिटणीस, पुणे शहर काँग्रेस कमिटी) अड . नंदलाल धिवार ( नगरसेवक) , कैलास गायकवाड ( नगरसेवक), राजेंद्र भुतडा सहित अध्यक्ष छत्रपती शिवाजी नगर ब्लॉक,बोपोडी ब्लॉक अध्यक्ष, खडकी ब्लॉक अध्यक्ष 209 शिवाजी नगर विधानसभा मतदार संघातील पक्षाचे सर्व निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते.


Post a Comment

0 Comments