मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
दिवंगत माजी खासदार माजी मंत्री वसंतराव चव्हाण यांचे पुत्र कनव चव्हाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली .
हे नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी एडवोकेट जयदेवराव गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते अंकुश काकडे राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर माजी अध्यक्ष रवींद्र अण्णा माळवदकर प्रकाश मस्के सचिन तावरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष चंद्रशेखर धावडे आनंद सवाने शैलेंद्र जाधव नरेश पगडालू आदि यावेळी उपस्थित होते .
यावेळी कणव चव्हाण म्हणाले शरद पवार साहेबांसोबत पुन्हा निष्ठावंत कार्यकर्ते आले आहेत पुन्हा निष्ठावंत त्यांना साहेबांची आठवण संभ्रमाच्या वातावरणात सुद्धा कार्यकर्ते शरद पवार साहेबांसोबत पवार घराण्यातील नव्या पिढीचा शिलेदार आमदार रोहित पवार यांची तरुणांमध्ये आकर्षण होत असल्याने आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे व शरद पवार साहेबांचा आशीर्वाद आम्हाला मिळालाय असे मत कनव चव्हाण यांनी नियुक्ती पत्र देताना सांगितले


Post a Comment
0 Comments