मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
धनकवडी येथील ११ गणेश मंडळ एकत्रित येऊन देशातील सर्वात मोठ्या एकत्रित मिरवणूक मंगळवार दि. १९ सप्टेंबर रोजी दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. या मध्ये जवळपास ८ ते १० हजार नागरिक सहभागी होणार आहेत. ही मिरवणूक गुलाबनगर, धनकवडी येथून सुरू होऊन धनकवडी गाव, केशव कॉम्प्लेक्स, विद्यानगरी शिवशंकर चौक ते मोहनगर येथे काढण्यात येत आहे. या मध्ये ज्ञानप्रबोधिनी वाद्य आणि गोविंद बँड पथक असणार आहे.
या समारंभासाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, ३ महाराष्ट्र केसरी (डीवायएसपी) विजय चौधरी, आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टींग चँपियन कु.सुप्रिया सुपेकर, गिर्यारोहक कु. स्मिता घुगे व एशियन चँपियनशिप सिल्व्हर मेडल विजेता पै. धनराज भरत शिर्के हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, सफाई कामगारांचा सत्कार होणार आहे.
विश्वस्त,
अखिल मोहन नगर मित्र मंडळ, पुणे

Post a Comment
0 Comments