Type Here to Get Search Results !

पंतप्रधानांच्या नेतृत्वात भारत विश्वगुरूच्या दिशेने वाटचाल सुभाष देसाई यांचे विचारः एमआयटी डब्ल्यूपीयूत सामाजिक नेतृत्व विकास कार्यक्रमाचे उद्घाटन

मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज






पुणे, दिः २६ सप्टेंबर: “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाच्या जोरावर भारत विश्वगुरूच्या दिशेने वाटचाल करीत आहे. राजकारणी लोकांवर टिप्पणी करण्यापेक्षा सुशिक्षित युवकांनी या क्षेत्रात मोठ्या संख्येने सहभाग घेऊन देश सुधारणेच्या प्रक्रियेत सहभाग वाढवावा.”असे विचार गोव्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष उत्तम फळ देसाई यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिर्व्हसिटी तर्फे आयोजित सामाजिक नेतृत्व विकास कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमात विद्यापीठातील  ५ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते. 

यावेळी उत्तर प्रदेश मुख्यमंत्र्याचे वरिष्ठ सल्लागार अवनिश कुमार अवस्थी, पद्मश्री राज्यसभेचे सदस्य बाबा बलविरसिंग सिचवाल व पद्मश्री पोपटराव पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 
तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, सीएओ डॉ.संजय कामतेकर, कुलसचिव गणेश पोकळे, अधिष्ठाता डॉ. गणेश काकंडीकर आणि मिटसॉगचे संचालक डॉ. के.गिरीसन उपस्थित होते. 
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ.विश्वनाथ दा. कराड यांच्या मार्गदर्शनात व कार्याध्यक्ष राहुल कराड यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सुभाष देसाई म्हणाले,“या जगात अशक्य असे काहीच नाही ही गोष्ट लक्षात ठेऊन युवकांनी संघर्ष करावा. समाजसेवेचे व्रत धारण करून अर्थशास्त्र, राजकारण यांसारख्या क्षेत्रातही सर्वांनी चमक दाखवावी. लोकशाही देशात संशोधन, नवनिर्मिती व विकासाला चालना दयावी. युवकांमधील ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी समाज सेवा करावी.”




पोपटराव पवार म्हणाले,“ दिवसेदिवस मातीची पोत खराब होत आहे. त्याच प्रमाणे भूजल पातळी खालावली आहे. यामुळे देशाचे भविष्य धोक्यात आहे, हे लक्षात ठेऊन युवकांनी ग्राम सामाजिक परिवर्तनात सक्रिय सहभागी होऊन कार्य करावे. सकारात्मक नेतृत्वामुळे प्रगती ही वेगाने होते.”

अवनिश कुमार म्हणाले, “कठीण परिश्रम, बुद्धीमत्ता आणि प्रामाणिकपणेचा स्वीकार केल्यास प्रगतीपासून कोणीही थांबवू शकत नाही. युवकांनी संशोधनाबरोबरच स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करावी. तसेच समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकासाची गंगा पोहोचवावी. येणारा काळ महिलांसाठी असून या देशाला विश्वगुरू बनविण्यास त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असेल.” 

 पद्मश्री बाबा बलविर सिंग सिचेवाल म्हणाले, “सेवा ही परमधर्म आहे. हे तत्व लक्षात ठेऊन विद्यार्थ्यांनी देश, समाजसेवा, पर्यावरण आणि सेवाभाव सारखे विषय अंगी बाणावे. समाजाला योग्य दिशा देण्यासाठी चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. ज्या वेळेस शिक्षणात सेवाभाव स्वीकारला जाईल तेव्हा देश बदलण्यास वेळ लागणार नाही.”

डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले,“जी व्यक्ती समाजसेवेसाठी कार्य करते तीच खर्‍या अर्थाने ईश्वराला आनंदी करत असते. एमआयटी डब्ल्यूपीयूच्या माध्यमातून सुरू केलेल्या या कार्यक्रमात ६५ पेक्षा अधिक तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करतील. युवकांनी शिक्षणाबरोबरच समाजसेवेचे वृत धारण करावे.”
प्रा.डॉ. गणेश काकंडीकर यांनी प्रास्ताविक केले.
प्रा.डॉ गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. 

Post a Comment

0 Comments