मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
*पुणे, २३ ऑगस्ट २०२३:* पुणे आणि देशाच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतुलनीय योगदानाबद्दल डॉ. सुनीता तांदुळवाडकर, रुबी हॉल क्लिनिकच्या आयव्हीएफ आणि स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख यांची फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडियाच्या (FOGSI) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. एफओजीएसआय मध्ये २६६ सभासद आहेत आणि भारतातील ४०, ००० हून अधिक स्त्रीरोगतज्ञांचा समावेश आहे. या ऐतिहासिक कामगीरीमुळे एफओजीएसआय सारख्या प्रतिष्ठित पदावर विराजमान होणाऱ्या त्या पुण्यातील पहिल्याच महिला प्रतिनिधी ठरल्या आहेत.
उल्लेखनीय कारकीर्दीसह आता डॉ. तांदुळवाडकर आता भारतातील ५ व्या दिग्गजांच्या विशेष गटात सामील झाल्या आहेत, ज्यांनी प्रतिष्ठित आएजीई (इंडियन असोसिएशन ऑफ गायनॅकॉलॉजिकल एंडोस्कोपिस्ट) २०१९-२०२० मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे, आयएसएआरच्या (इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अड्वान्स रिसर्च ) अध्यक्षपदी २०२६ पर्यंत असणार आहेत आणि आता, २०२३-२०२५ पासून एफओएसआय विराजमान होणार आहेत. त्यांच्या या नेतृत्वाच्या भूमिकेचा हा त्रिफळा भारतीय वैद्यकीय शास्त्राच्या इतिहासाचा वारसा आणखी मजबूत करते. रुबी हॉल क्लिनिकमध्ये सेवा करण्यासाठी समर्पित असलेल्या अनेक वर्षांच्या कालावधीत, डॉ. तांदुळवाडकर यांनी असंख्य रूग्णांना केवळ अपवादात्मक वैद्यकीय सेवाच दिली नाही तर व्यक्ती आणि कुटुंबांना त्यांच्या अचूक उपचार आणि मार्गदर्शनाच्या योगदानाद्वारे पालकत्वाचा आनंद देखील मिळवला आहे.
एफओजीएसआय ही प्रचंड विस्तार आणि प्रभाव असलेली संस्था असून, संपूर्ण भारतातील महिलांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. अशा परिणामकारक घटकाचे मार्गदर्शन करण्यासाठी वैविध्यपूर्ण कौशल्याची आवश्यकता असते या निकषावर केवळ डॉ. तांदुळवाडकर खऱ्या ठरत नाहीत त्याही पलीकडे जाऊन आपले योगदान देत आहेत. स्त्रीरोग, प्रसूतीशास्त्र आणि एन्डोस्कोपी तंत्रांमध्ये प्रगल्भ कौशल्य असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील काही रत्नांपैकी त्या एक आहेत. डॉ. तांदुळवाडकर यांची या गुंतागुंतीच्या क्षेत्राला कुशलतेने हाताळण्याची अपवादात्मक क्षमता त्यांना भारतीय वैद्यकीयशास्त्राच्या भवितव्यासाठी आशेचे किरण ठरत आहेत.
*रुबी हॉल क्लिनिकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पुर्वेझ ग्रँट* म्हणाले, डॉ. सुनीता तांदुळवाडकर यांचे या ऐतिहासिक कामगिरीबद्दल हार्दिक अभिनंदन. वैद्यकीय क्षेत्र आणि महिलांच्या आरोग्यासाठी त्यांची अथक बांधिलकी आणि समर्पण याचा खूप अभिमान आहे. हे यश केवळ रुबी हॉल क्लिनिकमध्येच नाही तर संपूर्ण वैद्यकीय बंधुभगिनींनाही प्रेरणा देणारे ठरेल .
या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल बोलताना *रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बेहराम खोडाईजी* म्हणाले, "डॉ. सुनीता तांदुळवाडकर यांनी समर्पण, नावीन्य आणि नेतृत्व या भावनेला मूर्त रूप दिले आहे. एफओजीएसआयच्या अध्यक्षपदी झालेली त्यांची निवड केवळ पुणेकरांसाठी अभिमानास्पदच नाही, तर भारतातील महिलांच्या आरोग्यासाठी एका नव्या युगाची सुरुवात ही आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली, एफओजीएसआयच्या प्रसूती आणि स्त्रीरोग शास्त्राच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रगती करण्यास तयार आहे."
ही यश केवळ एखाद्या व्यक्तीचे कर्तृत्व नसून भविष्यातील प्रगतीचा दाखला आहे. डॉ. तांदुळवाडकर यांच्या दूरदृष्टी आणि वचनबद्धतेसह, एफओजीएसआय संपूर्ण देशात महिलांच्या आरोग्य आणि सक्षमीकरणाला चालना देत नवीन उंची गाठू इच्छित आहे.
पुण्यातील FOGSI च्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून डॉ. सुनीता तांदुळवाडकर यांची ऐतिहासिक कामगिरी ही महिलांच्या आरोग्याच्या क्षेत्रातील एक मैलाचा दगड ठरला आहे. त्यांचे अनुकरणीय नेतृत्व आणि अतुलनीय कौशल्याने, त्यांच्या एफओजीएसआयला भारतातील महिलांसाठी महत्त्वपूर्ण प्रगती आणि वृद्धिगंत करण्याचे वचन देत आहेत. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, समर्पण, नवकल्पना आणि उत्कृष्टतेचा शोध याच्या अमर्याद क्षमतेवर प्रकाश टाकणारा आहे.
About FOGSI
The Federation of Obstetric and Gynaecological Societies of India of the largest is professional organization representing practitioners of obstetrics and gynaecology in India. With its widespread influence and commitment, FOGSI has been at the forefront of championing women's health issues, ensuring they receive the highest standard of care and knowledge. FOGSI with 266 member societies and over 40,000 gynaecologist access in India members.
For more information, please visit: www.rubyhall.com
For Enquiries,
Contact: Nirali Doshi : 98193 67345
Email: nirali@whitemarquesolutions.com

Post a Comment
0 Comments